पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे...

<p>पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे...</p>

कोल्हापूर - धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या ८० बंधारे पाणीखाली गेले आहेत तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आज दुपारी १२ वाजता पंचगंगा नदी ३६ फुटावर होती. नदीची इशारा पातळी ३९ फुट असून धोका पातळी ४३ फुट आहे.