‘या’ मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे वयाच्या ९१ वर्षी निधन

मुंबई – '3 इडियट्स' चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारणारे मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९१ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी बॉलिवूडसह मराठी सिनेमांमध्ये खूप काम केले आहे.
सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतलेल्या अच्युत पोतदार यांनी शिक्षण, भारतीय सैन्य दलात सेवा, इंडियन ऑइल कंपनीतील करिअर आणि अभिनय या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी 1980 च्या दशकात चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावरुन आपली प्रतिभा दाखवली.