कोयना, वारणा धरणातून विसर्ग वाढला...

नदीकाठच्या  नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

<p>कोयना, वारणा धरणातून विसर्ग वाढला...</p>

सातारा – कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 
कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ८ फुटांवरून ९ फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. धरणातून  ६५ हजार ६०० क्युसेक आणि विद्युत गृहातून २ हजार १०० क्युसेक्स विसर्ग, असे एकूण ६७ हजार ७०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
वारणा धरणाच्या वक्र दरवाज्यातून  23 हजार क्युसेक्स विसर्ग वाढवून तो 28 हजार 355 क्युसेक करण्यात आला आहे आणि  विद्युत गृहातून 1 हजार 630 क्युसेक  असा एकूण 29 हजार 985 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.