कोल्हापुरच्या शैक्षणिक श्रृंखलेत बलभीम विद्यालयाचे मोलाचे योगदान : आ.सतेज पाटील

कोल्हापूर – कोल्हापुरच्या शैक्षणिक श्रृंखलेत बलभीम विद्यालयाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले. कसबा बावडा येथे सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीच्या बलभीम विद्यालय आणि शांतादेवी डी. पाटील बालक मंदिर या शाळांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार जयंत आसगावकर, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, संस्थेचे संस्थापक कृष्णराव कारंडे, अध्यक्ष विनायक कारंडे, उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत या संस्थेने उभारलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत असल्याचे सांगितले. गुणवत्तेच्या जोरावर आसपासच्या चार-पाच गावांमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतायत हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार जयंत आसगावकर यांनी, कधीकाळी १०० पट असलेल्या या संस्थेत आज साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेतात. हीच गुणवत्तेची पोहोचपावती असल्याचे सांगितले. या संस्थेने दर्जेदार शिक्षणाची ही परंपरा अशीच अखंडित सुरु ठेवावी,असं आवाहन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष विनायक कारंडे यांनी, संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या मोहीत पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय प्रज्ञाशोध परिक्षेच्या मार्गदर्शिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल.
यावेळी संस्थेचे सचिव इंद्रजित कारंडे, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, अजित पोवार, डॉ संदीप नेजदार, माधुरी लाड, जे एल पाटील, नाना उलपे, मुख्याध्यापक अनिल सरक, पूजा पाटील, रोहीणी माळी आदि उपस्थित होते.