आजपासून कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात...

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचचे उदघाटन काल झाले. त्यानंतर आज सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सर्किट बेंचच्या आवारात ज्येष्ठ वकिलांसह नवोदित वकिलांनी आणि पक्षकारांनी गर्दी केली होती. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे स्थानिक नवोदित वकिलांसह परजिल्ह्यातील वकिलांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.