‘या’ जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
अनेक गावांमध्ये पूरस्थिती

नांदेड – राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, सांगली, कोल्हापूर सह अन्य जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. राज्याच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात हाहाकार उडाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून 'एनडीआरएफ'ची टीम घटनास्थळी पोहोचत आहे.