चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला...

<p>चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला...</p>

सांगली – राज्यातील सर्व जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरल्याने नदींच्या पाणी पातळीत वाढ होवू लागली आहे. चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत चांदोली धरण परिसरात त्र्याऐंशी मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे  धरणातून वारणा नदीमध्ये  पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सध्या चांदोली धरणातून सहा हजार सहाशे तीस क्यूसेकने पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे वारणा धरण व्यवस्थापनाने वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.