राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले  

पाण्याचा प्रवाह वाढला

<p>राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले  </p>

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वाढत्या पावसाच्या जोरामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा 1,2,3,4, 5,6 आणि  7 असे सर्व दरवाजे उघडले आहेत. सात दरवाज्यातून दहा हजार क्युसेक्स आणि विद्युत गृहातून 1500 क्युसेक्स  असा एकूण 11 हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.