एस न्यूज सार्वजनिक विधायक गणेश उत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण थाटात...

<p>एस न्यूज सार्वजनिक विधायक गणेश उत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण थाटात...</p>

कोल्हापूर - जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्कच्यावतीने आयोजित एस न्यूज सार्वजनिक विधायक गणेश उत्सव स्पर्धा आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बक्षीस समारंभाला, जीटीपीएल, एसपीएन डिजिटल नेटवर्कचे संचालक विनय नलावडे, व्यवस्थापक नविन मेंच, गोकुळचे संचालक बाबासो चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्कचा सार्वजनिक आणि घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचा उपक्रम विधायकता वाढवणारा असल्याचा सांगितले. दरवर्षी गणेश मंडळांच्यावतीने समाज प्रबोधनात्मक देखावे साकारले जातात. यापुढंही गणेश मंडळांनी समाज प्रबोधनात्मक विधायक गणेश उत्सवाकडे वळावे, असं आवाहन केलं. हे करत असतानाच, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे कार्य मंडळांनी हाती घ्यावं. आर्थिक परिस्थिती नसल्यानं अनेक विद्यार्थी अजूनही शिक्षणाच्या प्रवाह बाहेर आहेत. अशा विद्यार्थ्यांना, गणेश मंडळांनी शिक्षणासाठी दत्तक घेऊन मदतीचा हात द्यावा,असं त्यांनी सांगितलं.

आमदार सतेज पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात गणेश मंडळाचं योगदान मोठं असल्याचं मनमोकळेपणाने सांगितले. गणेश उत्सव काळामध्ये एक कुटुंब म्हणुन दहा-बारा दिवसांमध्ये आपण सर्वजण एकत्र येत असतो. महाविद्यालयीन काळात मंडळाच्या कार्यात मी देखिल सक्रिय असायचो. गणेश उत्सव झाल्यानंतर हिशेब देण्यापासून सर्व कामं केली असल्याच्या आठवणींही त्यांनी सांगितल्या.

एस न्युजचे संपादक कृष्णात जमदाडे यांनी, गणेश मंडळांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी या स्पर्धा आयोजीत करण्यात येतं असल्याचं सांगितलं. स्पर्धेचे परीक्षक पर्यावरण प्रेमी भाऊसाहेब सूर्यवंशी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. कसबा बावडा इथल्या भैरवनाथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते निलेश पाटील यांनी, जीटीपीएल एसपीएन डिजिटल नेटवर्कच्यावतीने आयोजित एस न्यूज सार्वजनिक विधायक गणेश उत्सव स्पर्धेच्या माध्यमातून मायेचं पांघरून घालण्याच काम होत असल्याचे सांगितले. जुना बुधवार पेठेतल्या हाय कमांडो फ्रेंड सर्कलचे संदीप रोटे यांनी, आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यावर्षीच्या गणेशोत्सवापासून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, स्पर्धेच्या निकालामध्ये सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळाला देण्यात आला. या मंडळांनं प्रबोधनात्मक ऐतिहासिक सजीव देखावा साकारला होता. व्दितीय क्रमांक शासकीय धान्य गोडाऊन परिसरातील पोवार मळा इथल्या श्री भैरवनाथ कला, क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ यांना मिळाला. या मंडळांनं शंकर गणपती जटावरील नृत्याचा तांत्रिक देखावा आणि नाग धबधब्याचा देखावा साकारला होता. तिसरा क्रमांक राजारामपुरीतील १३ वी गल्लीतल्या श्री. लंबोदर तरुण मंडळानं पटकावला. या मंडळांनं धार्मिक समाज प्रबोधनाचा तांत्रिक देखावा साकारला होता.

सजीव देखावा स्पर्धेत प्रथम कमांक कसबा बावड्यातील कवडे गल्लीतील श्री गणेश पुजा मित्र मंडळाला देण्यात आला. या मंडळांनं सध्याची पिढी संस्कार कमी झाल्यानं वाईट संगतीत. हा सजीव देखावा साकारला होता. दुसरा क्रमांक कसबा बावडा येथील स्वस्तिक चौकातील स्वस्तिक मित्र मंडळानं पटकावला. या मंडळांनं बदलणाऱ्या जगाबरोबर बदलणारी नाती यांचा मेळ घालणारा सजीव देखावा साकारला होता. तृतीय क्रमांक कसबा बावडा येथील वाडकर गल्लीतील मनोरंजन तरुण मंडळाला देण्यात आला. या मंडळानं दख्खनचा राजा जोतिबा, हा पौराणिक सजीव देखावा साकारला होता. तांत्रिक देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्ना जुना बुधवार पेठेतील शिपूगडे तालीम समोरील हाय कमांडो फ्रेंड सर्कलला देण्यात आला. या मंडळांनं मधमाशी वर प्रबोधनात्मक देखावा साकारला होता. याच गटामध्ये दुसरा क्रमांक कसबा बावडा पवार मळा येथील विजेता तरुण मंडळाला देण्यात आला. या मंडळाने डेहराडून येथील रुद्रेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती आणि इतिहास यावर देखावा साकारला होता. तिसरा क्रमांक कसबा बावडा माळ गल्ली येथील श्री जय भवानी तालीम मंडळानं पटकावला या मंडळांनं पाण्याचा धबधबा आणि त्यावर शंकराची पिंड हा तांत्रिक देखावा साकारला होता.

सार्वजनिक गणेश मंडळ आकर्षक मूर्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक साने गुरुजी वसाहत येथील च्याव म्याव ग्रुपला देण्यात आला. द्वितीय क्रमांक हा तोरस्कर चौकातिल नुकड मित्र मंडळाला तर तृतीय क्रमांक शनिवार पेठतल्या न्यू अमर मित्र मंडळाला देण्यात आला. घरगुती आरास स्पर्धेतून प्रबोधनात्मक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले होते. या गटामध्ये प्रथम क्रमांक संदीप पाटील यांनी पटकावला द्वितीय क्रमांक धीरज पत्की यांनी तर तृतीय क्रमांक प्रदीप मोरे यांनी मिळवला आकर्षक सजावट मध्ये प्रथम क्रमांक नितीन निकम, द्वितीय क्रमांक संदीप जाधव, आणि तृतीय क्रमांक पूनम चव्हाण यांना देण्यात आला. वैशिष्टपूर्ण रिल्समध्ये प्रथम क्रमांक प्रकाश जाधव, द्वितीय क्रमांक नितीन नागरपोळ आणि तृतीय क्रमांक आयुष आकूर्डे यांना देण्यात आला.