जगदीप धनखड बेपत्ता झाले आहेत तसे निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत..?
खा. संजय राऊत यांचा सवाल

मुंबई - "माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता झाले आहेत, तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत, ते कुठे गेले?" असा थेट सवाल खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजीव कुमार यांनी 'गद्दारांना' शिवसेना हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह दिले होते, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून राजीव कुमार यांनी उत्तर द्यायला हवे होते. दोन हजार चोवीस साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले, ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.