‘युतीचं डोक्यातून काढून टाका...’: अजित पवारांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सूचना 

<p>‘युतीचं डोक्यातून काढून टाका...’: अजित पवारांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सूचना </p>

भंडारा -  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधील युतीबाबत सूचक विधान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथं युती होईल, तिथं युती करायची, असं आमचं धोरण आहे. त्यामुळं युतीचं डोक्यातून काढून टाका, अशी सूचना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.  आपली ताकत असेल तर आपण लढायचं. त्यामुळे आपणच प्रत्येक प्रभागात आपलाच उमेदवार निवडणूक लढेल या विचारानेच प्रत्येकाने आता कामाला लागलं पाहिजे,  आपण गफलतीत राहणार नाही. अशा सूचना देत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.