मतचोरीचा गोंधळ सुरूच : खोपोलीत 140 मतदारांची नावे दोनदा...

<p>मतचोरीचा गोंधळ सुरूच : खोपोलीत 140 मतदारांची नावे दोनदा...</p>

रायगड – खा. राहुल गांधी यांनी देशातील मतचोरीचा घोटाळा बाहेर काढल्यापासून अनेक मतदान केंद्रातील  मतचोरीचे प्रकार समोर येत आहेत. असा प्रकार रायगड जिल्ह्यातील खोपोली मतदान केंद्रात घडला आहे.
खोपोली मतदान केंद्रात 140 मतदारांची नावे दोनदा आल्याचे समोर आले आहे. आपचे नेते डॉ. रियाज पठाण यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय.तसेच त्यांनी याबाबत निवडणुक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. पठाण यांनी खोपोलीतील प्रभाग क्रमांक 10 च्या पाच याद्या म्हणजेच केवळ 4 ते 5 हजार मतदारांच्या नावांचा अभ्यास केला आहे. यामध्ये 140 मतदारांची नाव दोनदा आली असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले आहे.