कोल्हापुरात एस. के. स्केटिंग अकॅडमीचा ७९ वा स्वातंत्र्यदिन अनोख्या विक्रमाने साजरा
७९मिनिट नॉनस्टॉप स्केटिंगने तीन विक्रमांमध्ये नो

कोल्हापूर - भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एस. के. रोलर स्केटिंग अॅकॅडमी तर्फे कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉल येथे ७९ मिनिट नॉनस्टॉप स्केटिंग चा अनोखा विक्रम पार पडला. या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद तीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम ग्रंथांमध्ये झाली. ७९ मिनिटांच्या सलग स्केटिंगमधून विद्यार्थ्यांनी केवळ कौशल्यच नव्हे, तर देशप्रेम, सातत्य, आणि संघभावना यांचंही उत्तम उदाहरण सादर केलं. या यशामुळे कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळलं आहे.
या विक्रमी उपक्रमात एस. के. स्केटिंग अकॅडमीचे सारा कच्छी, मोहमद कच्छी, शिवराज रेपे, राजलक्ष्मी गवळी, शिवांश बहिरशेठ, नेत्रा अतिग्रे, कायरा राणे, रेणुश्री मोरे, डॉ. महेश्वर शितोळे, शिवाय शितोळे, आदिराज पाटील, अवनी पाटील, नक्ष शहा, समरजीत जितकर, आर्यवीर घोडके, यशोधन पोवार, तस्मिया सय्यद, नेत्रा जाधव, रेवांश रेवनकर, सचिन खेडेकर, माऊली देसाई, समर्थ मुळये, धैर्य ओसवाल, हिरणमयी कारेकर, उत्कर्ष बेलवलकर, शरण्या सडोलीकर, विष्णू पाटील, आयुष शिंदे, भुमीजा भालेकर, विराज जगदाळे, नवमी गलांडे, यशवर्धन राऊत, अभिनव भेंडवडे, मीरा मुल्लाणी, जिजा फराकटे, तुळजा निंबाळकर, आदिराज उध्दव अथणे, मुद्रा पाटील, अनन्या शवलकुमार, आस्विका एस., अंशवीर खांडेकर, यश पाटील, रिया जाधव, रेयांश ढवळे, प्रियांशी मगर, अंजनी पाटील, अदिरा पाटील, जिजा जाधव, ऋषीकेश पाटील, अबीर संकपाळ, देव घेवारी, अद्विक माळी, इशाणा मुल्ला, आयांशु देवकर आदी स्केटर्स सहभागी झाले होते.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सुहास कारेकर, गोजीरा जगताप-कारेकर, आणि माजी उपमहापौर भूपाल शेट्टी यांच्या संयोजनातून पार पडले.