कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज १८ ऑगस्टपासून सुरू
चार न्यायमूर्तीं कामकाज बघणार

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सोमवारी १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी चार न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे बसण्याचे ठिकाण व कार्यविभाग पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:
खंडपीठ (कोर्ट रूम क्रमांक 1, जुनी कौटुंबिक न्यायालय इमारत) -
न्यायमूर्ती:
१) एम. एस. कर्णिक
2) शर्मिला यू. देशमुख
कोणत्या प्रकारची प्रकरणे-
1) फर्स्ट अपील
2) फॅमिली कोर्ट अपील
3) करसंबंधी वाद
4) कमर्शियल कोर्ट्स ॲक्टमधील अपील
5) लेटर्स पेटंट अपील
6) गुन्हेगारी रिट
7) फौजदारी अपील
8) मृत्युदंड पुष्टी प्रकरणे
9) गुन्हेगारी अवमान याचिका
10) पॅरोल, फर्लो, शिक्षा कमी करण्यासंबंधी अर्ज
11) जनहित याचिका
12) नागरी रिट याचिका
सिंगल बेंच क्रमांक 1 (कोर्ट रूम क्रमांक 2, RCC इमारत, पहिला मजला) -
न्यायमूर्ती : शिवकुमार डिगे
कोणत्या प्रकारची प्रकरणे:
1) फौजदारी अपील
2) गुन्हेगारी रिट
3) क्रिमिनल रिव्हिजन
4) जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज
5) मध्यस्थी व सलोखा कायद्यातील प्रकरणे
सिंगल बेंच क्रमांक 2 (कोर्ट रूम क्रमांक 3, RCC इमारत, दुसरा मजला)-
न्यायमूर्ती: एस. जी. चपळगावकर
प्रकारची प्रकरणे:
1) नागरी रिट याचिका
2) सेकंड अपील
3) नागरी पुनरावलोकन अर्ज
4) आदेशाविरुद्ध अपील
5) कंपन्या कायदा व बँकिंग रेग्युलेशन ॲक्टखालील प्रकरणे
ही कामकाज व्यवस्था १४ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एच. एम. भोसले यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली