गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांकडून संचलन...

 

आर. के. नगर आणि कळंबा साई मंदिर परिसरात करवीर पोलिसांकडून संचलन

<p>गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांकडून संचलन...</p>

<p> </p>

कोल्हापूर - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलीस प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी संचलन करण्यात येत आहे. आगामी गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव शांततेत आणि उत्साहात संपन्न व्हावा. यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संवेदनशील भागात संबंधित पोलीस ठाण्याकडील अधिकाऱ्यांना पोलीस संचलन करण्याच्या सूचना दिल्यात.

पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनंतर करवीर पोलिसांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील अशा आर. के. नगर, मोरेवाडी, खडीचा गणपती तसेच कळंबासाई मंदिर परिसरात संचलन केले. यावेळी करण्यात आलेल्या संचलना दरम्यान पोलिसांनी दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिके देखील सादर केली. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे या तीन अधिकाऱ्यांसह १६ अंमलदार आरसीपी पथक आणि इतर पोलीस सहभागी झाले होते.