स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने मशाल मिरवणूक...

 हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

<p>स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने मशाल मिरवणूक...</p>

कोल्हापूर - हिंदु एकता आंदोलनाच्यावतीने सन १९८० पासून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मशाल मिरवणुकीची सुरुवात मिरजकर तिकटी येथील क्रांती स्तंभ चौकातून करण्यात आली. सुरुवातीला माजी सैनिकांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या मशाल मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत ही मशाल मिरवणूक काढण्यात आली.

या मशाल मिरवणुकीत हिंदू एकता आंदोलनचे जिल्हा अध्यक्ष दिपक देसाई, हिंदुराव शेळके, विलास मोहते, वैभव कवडे, प्रतिक डिसले, विशाल रॉय, पियुष करडोने, राहुल साखळकर, संदीप साळुंखे, बाबु साखळकर, अनिल गायकवाड, वसंत महाडिक, आदित्य मोरे, निलेश जाधव, हर्षद संकपाळ, जितेश सूर्यवंशी, सुधाकर वडगावकर, कुमार काटकर, जयवंत खतकर, उत्तम भोसले, शांताराम इंगवले, प्रकाश आयरेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.