‘या’ महापालिकेसमोर खाटीक संघटनेचे कार्यकर्ते पोहचले हातात कोंबड्या घेवून...

मुंबई – 15 ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमी निमित्त राज्यातील काही महापालिकांनी आज मांसाहार विक्रीस करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक चिकन आणि मटण दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेसमोर खाटीक संघटनेचे कार्यकर्ते हातात कोंबड्या घेवून दाखल झाले होते. यावेळी त्यांनी कोंबड्या हातात घेवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. हा वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.