पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडले ‘हे’ रेकॉर्ड

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडले ‘हे’ रेकॉर्ड</p>

नवी दिल्ली – आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी सलग 12 व्यांदा स्वातंत्र्यादिनाचे भाषण दिले आहे. देशाला सलग ११ वेळा संबोधित करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा त्यांनी विक्रम मोडला आहे. तसेच सर्वात मोठं भाषण म्हणजे 103 मिनिटांचं भाषण देण्याचं रेकॉर्डही त्यांनी मोडला आहे.
यापूर्वी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सलग 17 वेळा स्वातंत्र्यदिनाचे भाषण दिले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग भाषण देण्यामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे रेकॉर्ड मोडले नसले तरी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रेकॉर्ड मोडला आहे.
 माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी जानेवारी 1966 ते मार्च 1977 आणि नंतर जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 या काळात 15 ऑगस्ट रोजी 16 वेळा भाषणे दिली, त्यापैकी 11 भाषणे सलग होती. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 1964 आणि 1965 मध्ये दोनदा लाल किल्ल्यावरून भाषण केले होते.