इचलकरंजीत बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद...

बनावट नोटा विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

<p>इचलकरंजीत बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद...</p>

इचलकरंजी - बनावट भारतीय चलनी नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात आल्या असून यासंदर्भात कारवाईच्या सूचना पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना इचलकरंजीतल्या नारायण टॉकीज परिसरात एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट नोटा तयार करून विक्री करणाऱ्या इचलकरंजीतील अनिकेत शिंदे, राम सनदी आणि शोएब कलावंत या तिघांना अटक केली आहे.

 पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ९४ हजार दोनशे रूपयांच्या बनावट चलनी नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ७० हजार रूपये किमतीचे साहित्य असा सुमारे ३  लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.