एचडीएफसी बँकेचा कठोर नियम...खातेदारांना झटका

मुंबई - एचडीएफसी बँकेने बँक अकाऊंटची मिनिमम बॅलन्सची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे खातेदारांना मोठा झटका बसला आहे.
बँकेने लागू केलेल्या नवीन नियमामुळे आता 10 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपये बॅलन्स ठेवावे लागणार आहेत अन्यथा खातेदारांना दंड भरावा लागणार आहे. हा नियम 1 ऑगस्ट 2025 नंतर सेव्हिंग अकाऊंट उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना लागू करण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.