‘या’ दिवशी होणार सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष अन् चिन्हावर सुनावणी  

<p>‘या’ दिवशी होणार सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष अन् चिन्हावर सुनावणी  </p>

नवी दिल्ली – खूप काळापासून प्रतिक्षेत असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात 8 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्षाबाबत अंतिम सुनावणी तातडीने घ्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती कोर्टाने फेटाळून लावली होती. अखेर कोर्टाने सुनावणीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार हे कळणार आहे.  

दोन्ही बाजूंची सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पक्षाबाबत अंतिम फैसला देणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे.