गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंकडून आंदोलनाची हाक...

जरांगेंचा दंगल घडवण्याचा प्रोग्राम असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप 

<p>गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंकडून आंदोलनाची हाक...</p>

बीड -  आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर मोठी गर्दी होत असते. त्यात जरांगे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या हाकेमुळे  भर सणासुदीत मुंबईत मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे अनेकांकडून या आंदोलनाला विरोध होता आहे.


या आंदोलनामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. जरांगे पाटील यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे. याच दरम्यान गणेशोत्सवात मुंबईला जायचं आणि दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांचा असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.