विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाबाबत आमदार सतेज पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...

<p>विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाबाबत आमदार सतेज पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...</p>

कोल्हापूर - व्यवसाय आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत कोल्हापुरात असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय हे कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरीत करू नये, अशी मागणी केली आहे.

 व्यापार, उद्योग, शिक्षण यासाठी कोल्हापूर हे महत्वाचे केंद्र आहे. यामुळेच सध्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय कोल्हापूरात आहे. कार्यक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांसाठी कोल्हापूरातील कार्यालयच सोईचे आहे. कोल्हापूर हा चाळीस लाख लोकसंख्येचा जिल्हा असून कर्नाटक, गोवा या राज्यांसह महाराष्ट्रातील कोकणाला जोडणारा जिल्हा असल्याने येथे  पोलीस आयुक्तालय व्हावे, ही मागणी होतीय. ही मागणी प्रलंबित असताना आता विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय पुण्याला हलवण्यात येणार असल्याचे समजतंय. विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय हे स्वतंत्र इमारतीमध्ये कार्यरत असून या कार्यालयानजीक सुसज्ज असे पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे गृहविभागाची कामे जलद गतीने आणि सुरळीतपणे पार पडत असतात. या कार्यालयांमुळे कर्नाटक राज्य सीमा परिसर, आणि गोवा राज्याला जोडणाऱ्या तसेच कोकणा जवळच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभागाला मदत होत असते. या संदर्भात दि. १८/ऑक्टोबर / २०२३ रोजी पत्र व्यवहार केलेला होता, त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात 'विशेष उल्लेख सूचना' मांडली होती, असेही आमदार सतेज पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे.