कोल्हापुरात भरदिवसा घरफोडी...

घरात कुणी नसल्याचे पाहून चोरटयांनी साधला डाव

<p>कोल्हापुरात भरदिवसा घरफोडी...</p>

कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. अनिता परितेकर या न्यू शाहूपुरी परिसरातल्या अनंत प्रेस्टिज या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या तर त्यांचा मुलगा क्लासला गेला होता. दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत अज्ञात चोरट्यांनी डॉ. परितेकर यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, कपाटातील २५ हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल संच असा सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. दुपारी डॉ. परीतेकर यांच्या घरी जेवण करण्यासाठी आलेल्या महिलेला चोरीचा प्रकार निदर्शनाला तिने डॉ. परितेकर यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉ. परितेकर यांनी घरी येऊन माहिती घेत शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. भर दुपारी घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आज सकाळी शाहूपुरी तसंच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.