कोल्हापुरात इंडिया आघाडीचे आत्मक्लेष आंदोलन...

 

खा. राहूल गांधींवरील कारवाईचा कोल्हापुरात निषेध

<p>कोल्हापुरात इंडिया आघाडीचे आत्मक्लेष आंदोलन...</p>

<p> </p>

कोल्हापूर - लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींनी बिहार मधील मतदार यादींची पडताळणी आणि बनावट मतदारांच्या मुद्यावरून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. सोमवारी विरोधकांनी दिल्लीत संसद भवन ते निवडणूक आयोग मुख्यालय असा मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या दरम्यान पोलिसांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक केली होती. या अटकेच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधी स्थळाच्या परिसरात आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी निवडणुकीतील घोटाळ्यां संदर्भात राहूल गांधी यांनी पुरावे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने उत्तर दिले नसल्याने मतचोरीचा संशय वाढला असल्याचे सांगितले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी भाजप सत्तेच्या माध्यमातून लोकशाही संपवू पाहत असल्याचा आरोप केला.

या आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेविकाभारती पोवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, गणेश जाधव, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दिलीप पोवार, उदय नारकर, चंद्रकांत यादव, बाबुराव कदम, माजी नगरसेवक ईश्वर परमार, दुर्वास कदम, जय पटकारे, राजाराम गायकवाड, श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, डी. जी. भास्कर, संजय पोवार वाईकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.