अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना मिळणार खुशखबर...

मुंबई – आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना सरकारकडून खुशखबर मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली होती, त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. या भरतीमुळे पोलीस दलात नव्या आणि ताज्या दमाच्या तरुणांचा समावेश होणार आहे.