ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री : ब्राह्मण समाज अन् भास्कर जाधव यांचा वाद शिगेला

मुंबई - ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही, असे वक्तव्य एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले होते. आणि हा वाद आता शिंगेला पोहचला आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून टीका केली जात आहे. ब्राह्मण सहाय्यक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना जाधव यांना बेडकाची उपमा दिली आहे. निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात भडकवण्यात आले होते. घनशाम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर काही वाटल नसतं, पण समाज म्हणून पत्र लिहिलं याचे वाईट वाटले. माझ्याविरोधात जिल्ह्यात पत्र द्या, नाहीतर राज्यात द्या, मी ते गटारात फेकून देतो, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.