इंडिया आघाडी मोर्चा : खा. राहुल गांधींसह अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात....

<p>इंडिया आघाडी मोर्चा : खा. राहुल गांधींसह अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात....</p>

नवी दिल्ली – आज केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने संसद ते निवडणूक आयोग कार्यालय असा मोर्चा आयोजित केला होता. त्यानुसार ३०० खासदारांसह इतर पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून मोर्चाला सुरुवात केली होती. यावेळी मोर्चाला वाढता प्रतिसाद पाहून दिल्ली पोलिसांनी खा. राहुल गांधीसह अनेक खासदारांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.   

खासदारांनी हातामध्ये 'सेव्ह व्होट'चे बॅनर घेतले आहेत. यावेळी  दिल्ली पोलिसांनी, इंडिया आघाडीने या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगत मोर्चा अडवला आहे.