शिवसेनेकडून पुणे-बेंगलोर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न...

वाहनांची मोठी गर्दी   

कोल्हापूर - महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकीत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यासाठी शिवसेनेकडून पुणे-बेंगलोर महामार्ग अडवून जोरदार आंदोलन केले जात आहे. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने  तावडे हॉटेल येथे वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यावेळी आंदोलकांचा वाढता आक्रमकपणा पाहून पोलिसांनी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.