'या' मेळाव्यात प्री-वेडिंग बंद करण्याचा एकमुखी ठराव...

<p>'या' मेळाव्यात प्री-वेडिंग बंद करण्याचा एकमुखी ठराव...</p>

कोल्हापूर – मराठा समाजातील तरुणांच्या लग्नाची स्थिती पाहता वधू वरांच्या कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्त्व देणे गरजेचे असल्याचे मत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचा वधू वर मेळावा राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आला होता.  या  मेळाव्यात प्री-वेडिंग बंद करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.

यावेळी बोलताना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी, विवाह समारंभासाठी मोठ्या प्रमाणात केला जाणारा खर्च टाळावा, असे आवाहन केले. सद्या मुलांची विवाह वयोमर्यादा ३० ते ४० पर्यंत गेल्याने पालक हवालदिल झालेत. अशा वेळी पर जिल्ह्यातून होणारी फसवणूक टाळावी, यासाठी पालकांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अधार्मिक दोनदा अक्षता पद्धत बंद करावी. लग्नाचा इव्हेंट न करता कमीत कमी खर्चात विवाह करा. कुंडली पेक्षा कर्तुत्वाला महत्व द्या, ९६ कुळी पाहू नको. मुलगा - मुलगी भेद नको सुचना पालकांनी केल्या. काही पालकांनी विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, युवक जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील, प्रतीक साळुंखे, शंकरराव शेळके, प्रकाश जाधव, शिवाजी मोरे, डॉ लक्ष्मीकांत नलवडे, जयसिंगराव हवालदार आदी मान्यवर उपस्थित होते.