खोक्या उर्फ सतीश भोसलेला जामीन मंजूर...

बीड - शिरूर कासार येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी खोक्या उर्फ सतीश भोसलेला जामीन मंजूर केला आहे. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसले विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आला होता. या प्रकरणी अँडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला आहे त्यानुसार न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.