​जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? – विरोधकांचा सवाल

<p>​जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? – विरोधकांचा सवाल</p>

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव  २१ जुलै २०२५ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पत्रात त्यांनी “prioritise health care and abide by medical advice” असे म्हटले होते. त्याच दिवशी संध्याकाळी अनपेक्षितपणे त्यांनी राष्ट्रपतींची भेट दिली. त्यानंतर ते दिसले नाहीत. यावरून वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या अचानक राजीनाम्यामुळे “दबावाखाली” हा निष्कर्ष वर्तवला, आणि या निर्णयाला आरएसएस बीजेपीचा हात असल्याचा त्रिकोणी आरोप लावला. राज्यसभेचे खासदार आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी, कायद्याच्या माध्यमातून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे का? असा सवाल केलाय. तर खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधकांनी, उपराष्ट्रपती पदाच्या अधिकृतपदावरून बाहेर पडले असताना देखील, ते  बेपत्ता दिसत आहे हीच धक्कादायक बाब आहे, असे म्हटलंय. जगदीप धनखड कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? असा सवाल केलाय.