‘महादेवी हत्तीण वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात असणे योग्य’ 

पेटा इंडियाकडून सोशल मिडीयावर निर्वाळा 

<p>‘महादेवी हत्तीण वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात असणे योग्य’ </p>

मुंबई – वनतारामधून महादेवीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी प्रयत्न चालू असताना दुसरीकडे  पेटा इंडियाने सोशल मिडीयावर एका पत्राव्दारे महादेवी वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

पेटा इंडियाने महादेवी हत्तीणीच्या (माधुरी) बाबतीत माहिती देत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माधुरी हत्तीणीच्या पुन्हा नांदणी येथी मठात पाठवण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. परंतु, माधुरीसाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.

पेटा इंडियाने १६ जुलै २०२५ रोजी आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास पाठिंबा दर्शवला आहे. या आदेशात माधुरीच्या आरोग्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मानवाप्रमाणेच हत्तींसाठी देखील रुग्णसेवा, विशेष उपचार व निवृत्ती आवश्यक असल्याचे पेटाने स्पष्ट केले आहे. माधुरीला ग्रेड-४ अर्थरायटिस, वेदनादायक फूट रॉट (पायांची विकृती), आणि डोके हलवण्यासारखे मानसिक त्रासाचे लक्षण असणारे वर्तन दिसून येत आहे. ही सर्व लक्षणे तीव्र मानसिक त्रासाचे निदर्शक आहेत. गेली ३३ वर्षे ती एकाकी, साखळदंडात आणि काँक्रीटच्या जमिनीवर राहिली असून, त्यामुळे तिच्या वेदनांमध्ये भर पडली आहे. न्यायालयाने तिला चांगले वैद्यकीय उपचार, साखळींपासून मुक्तता आणि इतर हत्तींच्या संगतीत जगण्याचा हक्क दिला आहे, असे म्हटले आहे.