पर्यटकाला मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून सहा जणांना अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या एका पर्यटकाला मारहाण केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केलीय. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
कराड तालुक्यातील टेंभू येथील अक्षय जाधव हे गुरुवारी सायंकाळी २५-३० पर्यटकांसह कोल्हापुरात आले होते. त्यांची गाडी ताराराणी चौकात आल्यानंतर गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून दोन तरुणांशी वाद झाला. त्यानंतर आणखी चार जणांना चौकात बोलावून या सहा जणांनी अक्षय जाधव यांना जबर मारहाण केली. डोक्यात मार बसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरूयेत.
या प्रकरणी अमन मुजावर, कमरूद्दिन मुजावर, आरिफ सनती, आफ्रिद बागवान, कुजेफ मुजावर आणि सरफराज देसाई या सहा जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरा सर्वांना अटक करण्यात आली आणि शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.