२९ ऑगस्ट रोजी होणारं मुंबईतील आंदोलन म्हणजे अटीतटीची आणि आरपारची अंतिम लढाई

<p>२९ ऑगस्ट रोजी होणारं मुंबईतील आंदोलन म्हणजे अटीतटीची आणि आरपारची अंतिम लढाई</p>

मिरज : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत करण्यात येणारय. हे आंदोलन म्हणजे अटीतटीची आणि आरपारची अंतिम लढाई असणारय. या आंदोलनात लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव दाखल होणारयत. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी मराठा आरक्षणासाठी लढणार, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मिरजेतील पत्रकार बैठकीत दिली. ५८ लाख जुन्या नोंदी सरकारला मिळाल्या असून त्यातून मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे स्पष्ट झालंय. याआधारे हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे सरकारने आरक्षण मान्य केल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही. या आंदोलनात सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहन जरांगे-पाटील यांनी सांगितलं.