मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

कोल्हापूर - कोल्हापूर रेल्वे स्थानक आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मोबाईल चोरी करणारे शाहूपुरी भाजी मंडई परिसरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शाहूपुरी भाजी मंडई परिसरातून गणेश अनिल माने, गणेश शिवाजी माने आणि महादेव पाटील या तिघा चोरट्यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून तीन लाख ५८ हजारांचे ४६ मोबाईल संच जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, शिवानंद मठपती, सचिन जाधव, अनिकेत मोरे, अमित सर्जे, संजय पडवळ, विलास किरोळकर, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी, अशोक पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.