ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा...

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले जात आहे. यावेळी या आंदोलन स्थळी आ. सतेज पाटील यांनी भेट दिली आणि या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने हेजो जो निर्णय घेतला आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करा, तसेच ग्रामपंचायत घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणे हे चुकीचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर राज्य सरकारबरोबर संघटनेची बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. सतेज पाटील यांनी दिली आहे.