पुण्यात आणखी एक नवीन महापालिका होणार 

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुतोवाच 

<p>पुण्यात आणखी एक नवीन महापालिका होणार </p>

पुणे - पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील चौकातील वाहतूक कोंडी फोडणे खूप अवघड आहे. यासाठी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांनी आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक परिसराची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
 पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. या एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.