नांदणीकरांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन, मानले आभार ...

<p>नांदणीकरांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन, मानले आभार ...</p>

नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला परत आणण्याकरिता उभारलेल्या लढ्यात आमदार सतेज पाटील यांची महत्वपूर्ण भूमिका होती. ज्यावेळी महादेवी हत्तीनीला वनतारा इथं नेण्याचा निर्णय झाला, तेव्हा पासून सातत्यानं आमदार सतेज पाटील या विरोधात भूमिका मांडतायेत. महादेवीला परत आणण्यासाठी गुगलच्या माध्यमातून, जमा करण्यात आलेले दोन लाखाहून अधिक अर्ज आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रपतींकडं पाठवले होते. सर्वांनी मिळून उभारलेल्या या लढ्याला यश आलं असून, आता महादेवी हत्तीनीला परत पाठवण्याबाबत वनतारानं सकारात्मक भूमिका घेतलीय. यानंतर आज नांदणी गावातील ग्रामस्थांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर सायंकाळी भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. 

महादेवीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी सातत्यानं जी भूमिका मांडली, त्याचंच हे यश असल्याच्या भावना यावेळी नांदणीकरांनी व्यक्त केल्या.

यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शंकर पाटील, अण्णासो पाटील, नांदणी ग्रामपंचायत सदस्या शितल उपाध्ये, दीपक कांबळे, महावीर खंजीरे, माजी उपसरपंच महेश परीट, शुभम अनुसे, विनायक चौगुले, सत्तार पटेल, संकेत काळे , मानतेश जुगळे यांच्यासह नांदणी ग्रामस्थ उपस्थित होते.