घरी नोटांचा गठ्ठा सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना धक्का...

<p>घरी नोटांचा गठ्ठा सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना धक्का...</p>

नवी दिल्ली - अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी काही दिवसांपूर्वी 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांच्या गठ्ठ्यांनी भरलेली पोतीच्या पोती सापडली होती.  यावर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील समितीने वर्मांविरोधात महाभियोग चालवण्याची शिफारस केली होती. याच अधिवेशनात वर्मांवर महाभियोग चालवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना मोठा झटका बसला आहे. 

केंद्र सरकारने संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी लोकसभा खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या जात आहेत. लोकसभेत महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी किमान 100 आणि राज्यसभेत 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत.