वनताराची टीम पुन्हा कोल्हापुरात.... 

कोल्हापूर - नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीणीबाबत मोठी घडामोड सध्या कोल्हापुरात सुरू आहे. वनताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात आली असून शहरातील दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये वनताराचे सीईओ विहान करणे यांच्यासह इतर अधिकारी आणि मठाचे महास्वामी, लोकप्रतिनिधींची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वनताराची टीम भेटली होती. यावेळी मठ आणि राज्य सरकार यांच्या वतीने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. यासाठी आम्ही सहकार्य करू असे वनताराने म्हटले आहे.  
या बैठकीला मठाचे स्वामी,  माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे यांच्यासोबत इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दुसरीकडे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात परत आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महादेवी लवकरच परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत.