...आणि आमदार भास्कर जाधव यांना अश्रू अनावर
रत्नागिरी – आज एका मेळाव्यात शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मुलगा विक्रांत जाधव यांचे भाषण सुरू असताना वडील भास्कर जाधवांचा कंठ दाटून आला.
महाविकास आघाडी सत्तेत असताना मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांच्या मुलाने “आमच्या सोबत घात नाही, विश्वास घात झाल्याचे” म्हटल्यानंतर आ. भास्कर जाधवांना अश्रू आवरता आले नाहीत.