कोल्हापुरात पतीकडून पत्नीचा खून...

कोल्हापूर - कोल्हापुरातील महालक्ष्मीनगर येथे पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अस्मिता परशराम पाटील असे मयत महिलेचे नांव आहे.
व्याजाने घेतलेल्या पैशाचे काय केले याची विचारणा करत घरात पती परशराम पाटील याने पत्नीचा गळा आवळून खून केला आहे. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.