दादरमध्ये कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्याने मोठा राडा

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे दादरमध्ये जैन समाजाच्या लोकांनी मोठा राडा घातला आहे. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.पोलीस राडा घालणाऱ्या लोकांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित दादर येथील कबुतरखाना येथे रोज हजारो कबुतरं खाद्य खाण्यासाठी येतात. मुंबईतील ही एक प्रसिद्ध जागा आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने कारवाई करत कबुतरखाना ताडपत्रीने झाकला होता. कबुतरांना खाद्य घालवण्यार बंदी घालण्यात आल्याने सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले होते. एकीकडे अनेकजण या निर्णयाचं स्वागत करत असताना दुसरीकडे पक्षीप्रेमी आणि जैन समाजाने विरोध सुरु केला आहे.