खासगी बस वाहतुकदारांकडून अतिरिक्त भाडेवाढीची मागणी केल्यास तक्रार करा

<p>खासगी बस वाहतुकदारांकडून अतिरिक्त भाडेवाढीची मागणी केल्यास तक्रार करा</p>

कोल्हापूर : काही खासगी बस वाहतुक करणा-या वाहतुकदारांकडून शासकीय दर पत्रकाप्रमाणे भाडे न आकारता अतिरिक्त किंवा ज्यादा भाडेवाढ करुन नागरिकांची फसवणूक केली जात आहे.अतिरिक्त भाडेवाढीची मागणी किंवा दर आकारण्यात आल्यास mh५१.forhptr@gmail.com या इमेलद्वारे किंवा 02302990051 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी, जेणेकरुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

अशी कोणतीही भाडेवाढ करणे हे मोटार वाहन कायदा 1989 अन्वये गैरलागू असून सर्व खासगी बस वाहतूकदार व्यवसायिक व संघटनांनी अशी कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ किंवा नियमबाह्य कृती होवू नये याची दक्षता घ्यावी, तसेच याबाबत त्यांच्या जबाबदार व्यक्तींकडून नियमितपणे त्यासंबंधीचा आवश्यक आढावा घेवून त्याबाबतच्या उचित सुचना सर्व व्यावसायिकांना द्याव्यात.