भीम शक्ती सामाजिक संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने...

कोल्हापूर - काही दिवसांपासून सामाजिक तेढ निर्माण व्हावं, कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, गावागावात आणि शहरात दंगल भडकावी, या उद्देशाने काही राजकीय नेते आणि काही लोक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत तसंच जनसुरक्षा विधेयक रद्द करा, अशा मागण्या भीमशक्ती सामाजिक संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संजय कांबळे, अरुण कांबळे, राहल जावळे, सनी जावळे, रोहित मदाळे, करण जावळे आदी उपस्थित होते.