...तरच महादेवी लवकरात लवकर नांदणी मठात येईल : आ. सतेज पाटील

मुंबई – महादेवी हत्तीण नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या वनखात्याची भूमिका खूप महत्वाची आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आपली भूमिका सक्षम आणि सकारात्मक मांडायला हवी, तरच हत्तीण मिळायला मदत होणार आहे. असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. आजच्या बैठकीत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि लवकरात लवकर ही हत्तीण मठात परत यावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे आ. सतेज पाटील यांनी म्हटले आहे. आज मुंबईत महादेवी बाबत बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.