माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील आरएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कारकिर्दी गाजवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. अशा महत्त्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती.त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.