महादेवी हत्तीणीसाठी मंत्रालयात बैठक

 सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्याच्या सरकारच्या सूचना ; राजू शेट्टी 

<p>महादेवी हत्तीणीसाठी मंत्रालयात बैठक</p>

मुंबई – वनतारामधील सगळ्याच हत्तींची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे वनताराला राज्य सरकारने प्रश्न विचारावेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महादेवी हत्तीणीविषयी बैठक पार पडली. यानंतर राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते. 
राजू शेट्टी यांनी सांगितले कि, पेटाने बनाव करून हत्ती वनताराकडे  पाठवला आहे. आतापर्यंत वनतारामध्ये गेलेले काही हत्ती हयात नाहीत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे ते म्हणालेत.
धार्मिक परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्याच्या सरकारच्या सूचना असल्याचे त्यांनी सांगितले.