धक्कादायक : ‘या’ योजनेतून लाडक्या भावांनी 21 कोटी 44 लाख रुपये लाटले...

मुंबई - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ अनेक पुरुषांनी घेतला आहे. या लाभ घेतलेल्या 14 हजारांहून अधिक पुरुषांना राज्य सरकार नोटीस बजावणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 21 कोटी 44 लाख रुपये लाडक्या भावांनी लाटले आहे. या सर्व पुरुषांना एका महिन्यात पैसे परत करण्याची नोटीस दिली जाणार आहे, हे पैसे परत न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.